Illegal business : न्हाव्याच्या दुकानात टकल्या पुरुषांची गर्दी, पोलिसांना आला संशय, धाड टाकताच समोर आला मोठा कांड…

Illegal business : अनेक अवैध धंदे हे एखाद्या कामाच्या आडून केले जातात. जसे, मसाज पार्लरच्या नावाने सेक्स रॅकेट चावलणे, जनरल स्टोअरमधून दारु विकणे. नुकतेच इटलीतील एका शहरात असेच मोठे रॅकेट पकडण्यात आले आहे.

सामान्यत: पुरुष केस कापण्यासाठी, केसांना रंग देण्यासाठी किंवा दाढी काढण्यासाठी न्हाव्याच्या दुकानात जातात. पण, एका मोठ्या मोहिमेत गुंतलेल्या काराबिनेरी (इटली पोलिस) या पथकाने एका संशयित न्हाव्याच्या दुकानावर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांना काही असं कळालं की पाहून त्यांनाही धक्का बसला.

पोलिसांना या न्हाव्याच्या दुकानात डोक्यावर केस किंवा चेहऱ्यावर दाढी नसलेले पुरुष मोठ्या संख्येने भेट देत असल्याचं दिसून आलं. जर डोक्यावर केस नाही तर लोक या न्हाव्याकडे का जातात, हा प्रश्न पोलिसांना पडला होता.

त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिस पथकाने ही माहिती अधिकाऱ्यांना दिल्यावर दुकानाची चौकशी सुरू करण्यात आली. या दुकानात हे लोक केस कापण्यासाठी नव्हे तर ड्रग्जसाठी जात असल्याचं तपासात समोर आले असून हा न्हावी कुख्यात ड्रग डीलर असल्याचं कळालं.

पोलिसांनी ५५ वर्षीय न्हाव्याच्या घरी धाड टाकली. तेव्हा त्यांना तिथे अनेक ग्रॅम चरस सापडून आले, तसेच पोलिसांना त्याच्या दुकानात लपवून ठेवलेले १०० ग्रॅम कोकेन आणि ड्रग पॅकेजिंगही साहित्य सापडले.

न्हाव्याच्या दुकानाच्या नावाखाली ड्रग्जचा व्यवसाय करणाऱ्या आरोपीला मरासी कारागृहात नेण्यात आले आहे. जिथे सध्या तो न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा करत आहे. इटालियन पोलिसांना जेनोआच्या फॉसे भागात ड्रग्ज रॅकेटची माहिती मिळाला होती.

परंतु त्यांच्याकडे कोणताही पुरावा किंवा सुगावा नव्हता. त्यामुळे देखरेख पथकं तैनात करण्यात आली होती. यापैकी एका पथकाने या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.