Rohit Sharma : भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शुभमन गिलने सर्वोच्च ८७ धावा करून संघाला विजय मिळवून दिला. त्याच्या या शानदार कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. मात्र, हा सन्मान मिळाल्यानंतरही कर्णधार रोहित शर्मा त्याच्यावर नाराज असल्याचे दिसले.
भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली होती. अवघ्या १९ धावांवर दोन विकेट्स गमावलेल्या भारतीय संघाला गिल आणि श्रेयस अय्यरने सावरले. श्रेयसने आक्रमक फलंदाजी केली, तर गिलने डाव नियंत्रित ठेवला. त्यानंतर अक्षर पटेलच्या साथीनेही गिलने महत्त्वाची भागीदारी रचली आणि भारताच्या विजयाचा मार्ग सुकर केला.
सामना संपल्यानंतर रोहित शर्माने संघाच्या कामगिरीचं कौतुक केलं. तो म्हणाला, “भारतीय संघ बऱ्याच दिवसांनी वनडे क्रिकेट खेळत होता, त्यामुळे सुरुवात कशी होते, हे महत्त्वाचं होतं. गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली, ज्यामुळे विजयाची नीव घालता आली. मधल्या फळीत डावखुऱ्या फलंदाजाची गरज होती, म्हणून अक्षर पटेलला वर पाठवण्यात आलं. गिल आणि अक्षरने महत्त्वाची भागीदारी करत विजय सुकर केला.”
मात्र, सामना संपता-संपता घडलेल्या एका घटनेने रोहित नाराज झाला. भारताला विजयासाठी फक्त १४ धावा हव्या असताना शुभमन गिल बाद झाला, आणि यामुळे रोहितने नाराजी व्यक्त केली. त्याच्या मते, अशा निर्णायक क्षणी विकेट गमावणे टाळता आले असते.
शुभमन गिलच्या दमदार खेळीमुळे भारताला विजय मिळाला, पण अखेरच्या क्षणी झालेल्या चुका सुधारण्याची गरज असल्याचे रोहितने स्पष्ट केले.