शिंदेंच्या मनासारखं झालं, पक्ष चिन्ह मिळालं, पण लोकसभेत उपयोग नाही, भाजपने दिला वेगळाच प्रस्ताव…

सध्या लोकसभेच्या जागा वाटपाच्या चर्चा सुरू आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपाचा पेच कायम आहे. राज्यातील सरकारमध्ये तीन पक्ष असल्याने जागावाटपाचा तिढा कायम आहे. यामुळे अनेकांची डोकेदुःखी वाढली आहे. यामुळे अनेकजण नाराज देखील असल्याची माहिती आहे.

भाजपा अध्यक्ष जगतप्रकाश नुकतेच मुंबई दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत जागावाटपाबद्दल चर्चा केली. यामध्ये शिंदे यांची कोंडी झाल्याची माहिती समोर आली आहे. याचे कारण आहे, अजित पवार. अजित पवारांची राष्ट्रवादी सरकारमध्ये सामील झाल्याने जागावाटप आव्हानात्मक आहे.

दरम्यान, या बैठकीत नड्डा यांनी मुख्यमंत्री शिंदेंना एक महत्त्वाचा प्रस्ताव दिला आहे. तो म्हणजे ज्या मतदारसंघांमध्ये संभ्रम असेल तिथे महायुतीचे उमेदवार कमळ चिन्हावर लढतील, असा प्रस्ताव नड्डांनी शिंदेंना दिला आहे. यामुळे ती जागा आपल्याकडे घेणे सोप्प होईल, असा हा प्रस्ताव आहे.

यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नड्डा यांच्या प्रस्तावावर अद्याप तरी कोणताही निर्णय घेतलेला नाही. या प्रस्तावावर येत्या काही दिवसांत आणखी चर्चा होऊ शकते. नड्डा यांनी शिंदेंशी यांच्याशी तासभर चर्चा केली. यामुळे यात महत्वाची चर्चा झाल्याची माहिती आहे.

राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती आणि लोकसभा निवडणुकीसाठीचं जागावाटप हे चर्चेतले महत्त्वाचे मुद्दे होते. दरम्यान, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ४, शिंदेंच्या शिवसेनेला १२ जागा. उर्वरित ३२ जागांवर भाजप लढेल अशी चर्चा आहे. मात्र यावरून शिंदे गट नाराज आहे.

यावरुन शिंदे गटाचे खासदार गजानन किर्तीकर यांनी नाराजी व्यक्त केली. आमच्यासोबत कोणतीही चर्चा झालेली नाही. आम्ही भाजपच्या दावणीला बांधलेलो नाही, असे त्यांनी म्हणत भाजपवर निशाना साधला आहे.