Madhya Pradesh : मायलेकाच्या नात्याला काळीमा! मृत आईच्या शरीरसोबत मुलाचे राक्षसी कृत्य, दोन दिवस केला बलात्कार

Madhya Pradesh : नात्यांना आणि माणुसकीला लाजवेल असे एक प्रकरण मध्य प्रदेशातील इंदूरमधून समोर आले आहे. येथे एका ७० वर्षीय महिलेच्या मृतदेहावर तिच्याच मुलाने बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या जंगली मुलाने सार्वजनिक ठिकाणी बलात्कार केल्याचा व्हिडिओ समोर आला होता. पोलिसांनी सांगितले की, मृत महिलेच्या मुलाने तिच्या शरीरावर दोनदा बलात्कार केला. ही बाब उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी मुलाला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले.

या प्रकरणाची माहिती देताना पलासिया पोलीस ठाण्याचे प्रभारी जगदीश प्रसाद जामरे यांनी सांगितले की, बाडी ग्वालटोली परिसरातील एका गल्लीत २२ वर्षीय तरुणाने आपल्या ७० वर्षीय आईच्या मृतदेहावर बलात्कार केल्याचा आरोप आहे.

1 आणि 2 डिसेंबरच्या रात्री त्याने बलात्कार केला. जामरे यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले असता त्यांना तो मानसिकदृष्ट्या कमकुवत असल्याचे समजले.

या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, वृद्ध महिलेला बरगड्या आणि फुफ्फुसाच्या आजारामुळे श्वास घेण्यास त्रास होत असल्याने तिला शासकीय महाराजा यशवंतराव रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

तिच्या मृत्यूनंतर तिच्या मुलाने तिचा मृतदेह रुग्णालयातून नेला. स्टेशन प्रभारींनी सांगितले की, वृद्ध महिलेच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले आहे. आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही, असे ते म्हणाले.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 297 (मृतदेहसोबत असभ्यता) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास करणार्‍या आणखी एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले आहे.

तर म्हणाले, घटनास्थळाजवळील वसतिगृहात राहणाऱ्या दोन विद्यार्थिनींनी एका वृद्ध महिलेच्या मृतदेहावर तिच्या मुलाने केलेल्या कथित बलात्काराचा व्हिडीओ बनवून पोलिसांना माहिती दिली होती. माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.