मध्य प्रदेशातील खरगोनमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील बरवाह येथील कटकूट गावातील २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. हा तरुण क्रिकेट खेळत होता. क्रिकेट खेळत असताना त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागले, त्याच्या छातीत दुखू लागले. मग अचानक त्याचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर या कुटूंबाला एकच धक्का बसला. या तरुणाचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्याला एक वर्षाची मुलगीही आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत माहिती अशी की, २२ वर्षीय तरुण इंदलसिंग जाधव क्रिकेट खेळत होता. त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्याच्या छातीत दुखू लागले. त्यानंतर तो बेशुद्ध झाला. यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. इतरांनी त्याला लगेच काटकूट येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.
त्याला बारव येथील खासगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. सामन्यात इंदलसिंग जाधवने शानदार फलंदाजी आणि गोलंदाजी केली. ५ वे षटक टाकत असताना त्याची तब्येत बिघडली आणि तो मैदानाबाहेर आला.
यामुळे तो झाडाखाली बसला. यानंतर दुसऱ्या खेळाडूने गोलंदाजी केली. शेवटचे षटक टाकल्यानंतर इंदलचा संघ विजयी होताच खेळाडूंनी नाचायला सुरुवात केली. मात्र तो बेशुद्ध पडला. यामुळे इतरकांना मोठा धक्काच बसला. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे.
दरम्यान, त्याच्या कुटुंबीयांनी इंदलला प्रथम काटकूट आणि नंतर बरवाह येथील खाजगी रुग्णालयात नेले. येथे डॉक्टरांनी इंदलचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या घटनेनंतर याठिकाणी मोठी गर्दी झाली होती. त्याचा मनमिळाऊ स्वभाव होता. यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.