अजित पवारांना धक्का! महत्वाच्या बैठकीला आमदारांची दांडी, आमदार शरद पवार गटात जाणार?

लोकसभा निकालानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची तातडीची बैठक मुंबईत झाली. बैठकीसाठी सर्व आमदारांना पाचारण करण्यात आलं आहे. मात्र, आज बैठकीकडे पक्षातील काही आमदार पाठ फिरवणली. यामुळे हे आमदार पुन्हा शरद पवार यांच्याकडे जाणार का? याची चर्चा सुरू झाली आहे.

लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात बसलेला जोरदार धक्का पाहता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मोठी अस्वस्थता असल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेला एक मंत्रीपद तर शिवसेनेच्या वाटेला एक राज्यमंत्री आणि एक कॅबिनेट पद येण्याची शक्यता आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे.

अजित पवार दिल्लीत एनडीएच्या बैठकीला देखील गेले असून नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, अजित पवार (Ajit Pawar) यांच्या देवगिरीवर खलबतं सुरू आहेत. नाराज आमदारांना तोंड कसं द्यायचं? याची रणनीती आखली जात असल्याची चर्चा सुरू आहे.

या बैठकीला रामराजे निंबाळकर, अनिल पाटील, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, संजय बनसोडे तसेच इतर मंत्री आमदार उपस्थित होते. मात्र काही आमदार यावेळी उपस्थित नव्हते. राज्यात शरद पवार यांनी आपली ताकद दाखवून दिली आहे. 10 पैसे आठ खासदार त्यांनी निवडून आणले.

यामुळे अजित पवार गटात नाराजी आहे. लोकसभा निवडणुकीच्या अपयशानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाची देवगिरीवर महत्त्वाच्या नेत्यांची आणि मंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे. या बैठकीला आतापर्यंत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, अनिल पाटील, आदिती तटकरे, संजय बनसोडे, आनंद परांजपे हे देवगिरीवर उपस्थित होते. 

दरम्यान, लोकसभा निवडणुकांच्या निकालांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले. यामुळे आता अजित पवार गटाने पुन्हा एकदा कंबर कसली असून आज मुंबईत तातडीची बैठक बोलावली होती. मात्र अनेक आमदार उपस्थित नसल्याने चर्चा सुरू झाली आहे.