Mumbai Indians : मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधारपदावरून का काढले? ‘ही’ ३ कारणे झाली उघड

Mumbai Indians : आयपीएलच्या ट्रेंड विंडोमध्ये मुंबई इंडियन्सने मोठा डाव खेळला अन् आपल्या तगड्या खेळाडूला पुन्हा ताफ्यात सामावून घेतलं. गुजरात टायटन्सकडून 15 कोटींच्या बदल्यात मुंबईने हार्दिक पांड्याला (hardik pandya) पटलणमध्ये सामील करून घेतलंय.

रोहित शर्मा (Rohit Sharma) संघात असताना हार्दिकला कर्णधार बनवणार का?, हा प्रश्न सर्वांना पडलेला होता. पण अखेर मुंबई इंडियन्सने शुक्रवारी आपला निर्णय जाहीर केला आहे. मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कॅप्टन्सीवरून पायउतार करत नव्या दमाच्या हार्दिक पांड्यावर संघाची जबाबदारी सोपवली आहे.

मात्र, रोहित शर्माला मुंबई इंडियन्सच्या कॅप्टन्सीवरून का हटवलं? त्याची नेमकी कारणं कोणती आहेत? रोहित हा पुढच्या हंगामात मुंबई इंडियन्सचा कर्णधार नसला तरी तो या संघाचा एक भाग नक्कीच असेल. हार्दिकच्या नेतृत्वाखाली रोहित हा एक खेळाडू म्हणून खेळू शकतो.

त्यामुळे कर्णधारपद गेलं असलं तरी रोहित हा मुंबई इंडियन्स सोबत असेल, अशी माहिती मुंबई इंडियन्सने प्रसिद्धी पत्रकात दिली आहे. त्यामुळे रोहितच्या मार्गदर्शनाखाली हार्दिक नेतृत्व करेल, अशी शक्यता आहे.

रोहित शर्मा गेल्या वर्षभरापासून टी-ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळला नाही. मागील आयपीएल हंगामात त्याने अखेरची टी-ट्वेंटी कॅप्टन्सी केली होती. मात्र, हार्दिकने टीम इंडियाची जबाबदारी सांभाळली आहे. त्यामुळे रोहितने टी-ट्वेंटीला टाटा गुड बाय केलाय, असं समजलं जातंय.

मुंबई इंडियन्स यंदाच्या हंगामात आयपीएल खेळणार नाही, असं माहिती समोर आली आहे. रोहित टी-ट्वेंटी वर्ल्ड कप खेळण्यासाठी आयपीएलमध्ये आराम करु शकतो, अशी देखील चर्चा आहे. त्यामुळे हार्दिकला कॅप्टन केलं असावं, असं मानलं जातंय.

वर्ल्ड कप 2023 मध्ये खेळणाऱ्या सर्वात वरिष्ठ खेळाडूमध्ये रोहित शर्माचं नाव होतं. त्यामुळे रोहित आगामी वर्ल्ड कपमध्ये रोहित नसेल. तर टी-ट्वेंटी फॉरमॅटमध्ये देखील रोहित खेळणार की नाही? अशी शंका उपस्थित होत आहे. भारत आणि साऊथ अफ्रिका यांच्यातील टी-ट्वेंटी मालिकेत देखील रोहित खेळला नसल्याने मुंबई इंडियन्सच्या कॅप्टन्सीवरून रोहित पायउतार होईल, हे स्पष्ट झालं होतं.

दरम्यान, मुंबई इंडियन्स संघाने 2013 मध्ये पहिलं विजेतेपद पटकावलं होतं. यानंतर त्याने 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये आयपीएल ट्रॉफी जिंकली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने 158 सामने खेळले आहेत. त्यातील 87 सामन्यात रोहितला यश मिळालंय. तर 67 सामन्यात पराभव पत्कारावा लागला आहेत. तसेच 4 वेळा सामना अनिर्णयित राहिला.