कानपूरमधील गंगा घाटाजवळ रेल्वे रूळाखाली एक महिला विवस्त्र अवस्थेत सापडली आहे. लोकांनी जेव्हा तिला पाहिले तेव्हा तिच्या अंगावर कपडे देखील नव्हते. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर लोकांनी घाटातील पांडा राजू यांना ही माहिती दिली.
राजूने लगेच त्या महिलेसाठी कपडे आणले. महिलेने सांगितले की, मंगळवारी सकाळी ६ ते ७ च्या सुमारास काही लोकांनी तिला चालत्या ट्रेनमधून ढकलले. त्यामुळे ती पुलाखालून गंगा नदीत पडली. यावेळी नदीत पाणी कमी होते.
त्यामुळे ती किनाऱ्यावर पोहोचली. महिलेचे म्हणणे ऐकून राजूने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल केले. कदाचित महिलेला धक्का बसला असावा, असे पोलिसांचे म्हणणे आहे. यामुळे तो काही सांगण्याच्या मनस्थितीत नाही.
महिलेवर वैद्यकीय उपचार केले जाणार आहेत. महिलेला पुलावरून 80 फूट वरून फेकण्यात आले आहे. त्यामुळे तिला खूप दुखापत झाली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान काहींनी पोलिसांच्या तपासावर संशय व्यक्त केला आहे.
दरम्यान, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून ही महिला थोडक्यात वाचली आहे. सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत माहिती तिच्याकडून घेतली जात आहे.
असे असताना मात्र तिला सध्या मोठा धक्का बसला आहे. यामुळे याबाबत अधिकची माहिती पुढे आली नाही. महिलेची तब्येत सुधारली की याबाबत अजून माहिती समोर येईल. याबाबत नागरिक संताप व्यक्त करत आहेत.