Dattatray Gade : काय करायचंय ते कर पण मला जिवंत सोड, तरुणी घाबरल्याने गाडेने पुन्हा तोडले शरीराचे लचके
Dattatray Gade : पुण्यातील स्वारगेट एसटी डेपो येथे 26 वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण शहर हादरले असताना, या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याने आता स्वतःच बचाव करण्यासाठी पीडितेवरच आरोप करण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांनी शिरूर तालुक्यातील गुणाट गावातील ऊसाच्या फडात सापळा रचून त्याला अटक केली होती. मात्र, चौकशीदरम्यान त्याने तरुणीने पैसे घेतले आणि स्वेच्छेने शरीरसंबंध ठेवले, असा खोटा दावा केला आहे.
जीव वाचवण्यासाठी पीडितेने केला प्रतिकार टाळण्याचा प्रयत्न
पोलिसांच्या तपासात असे समोर आले आहे की, पीडितेला जबरदस्तीने बसमध्ये नेण्यात आले होते. आरोपीने स्वतःला कंडक्टर असल्याचे भासवून तिला शिवशाही बसमध्ये नेले आणि दोन्ही दरवाजे बंद करून तीला पळून जाण्याचा कोणताही मार्ग ठेवला नाही. जबरदस्तीचा विरोध करताना पीडितेने आरडाओरडा केला, मात्र बसच्या काचा बंद असल्याने कोणीच मदतीला पोहोचू शकले नाही.
पोलिस तपासात असेही उघड झाले की, पीडितेने केवळ आपला जीव वाचवण्यासाठी विरोध करणे टाळले. अत्याचारानंतर पीडिता अत्यंत घाबरलेली असल्याचे पाहून दत्तात्रय गाडे याने दुसऱ्यांदा तिच्यावर बलात्कार केला.
दत्तात्रय गाडेचा गुन्हेगारी इतिहास उघड
पोलिस तपासात असेही समोर आले आहे की, गाडे याने यापूर्वीही एका महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र संबंधित महिलेने भीतीपोटी गुन्हा नोंदवला नव्हता. त्याऐवजी तिने फक्त चोरीची तक्रार दाखल केली होती.
गाडे हा पुण्यातील शिवाजीनगर, शिरूर आणि स्वारगेट एसटी स्टँड परिसरात फिरून महिला सावज हेरत असे, अशी कबुली त्याने यापूर्वी पोलिसांना दिली होती. तसेच, स्वारगेट पोलिसांनी जानेवारी महिन्यात त्याला मोबाईल चोरीच्या संशयावरून चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
गुन्हेगाराला पाठिशी घालणारे कुटुंबीय
गाडेच्या कुटुंबीयांनी त्याला निर्दोष ठरवण्याचा प्रयत्न केला असून, त्याची पत्नी आणि नातेवाईक त्याच्या बचावासाठी उभे आहेत. मात्र, तपासादरम्यान गाडेचा पूर्वेतिहास आणि त्याचे गुन्हेगारी वर्तन उघडकीस आल्याने, या कुटुंबाच्या दाव्यांमध्ये तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
या घटनेनंतर महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, अशा गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिक आणि महिला संघटनांकडून केली जात आहे.