भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मुलाखत दिली. भाजपाला बहुमताचा आकडा गाठता आला नाही, तर भाजपाकडे प्लॅन बी काय आहे? असा प्रश्न या मुलाखतीमध्ये त्यांना विचारण्यात आला होता. यावर त्यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे.
अमित शहा यांनी याबाबत भाजपाला किती जागा मिळू शकतात? याचे उत्तर दिले आहे. प्लॅन बी काही नाही. आम्हाला तशी कोणतीही शक्यता वाटत नाही. पंतप्रधान मोदी यांच्या योजनांचा लाभ मिळालेला ६० कोटींचा जनाधार आमच्याकडे आहे. या लाभार्थी गटात कोणत्याही एका जाती-धर्माचे, वयोमानाचे लोक नाहीत, असेही शहा म्हणाले.
या लाभार्थ्यांना नरेंद्र मोदी काय आहेत आणि त्यांच्यासाठी ४०० जागा का जरूरी आहेत, याची कल्पना आहे. तसेच ते म्हणाले, आमचा प्लॅ ए यशस्वी होणार आहे. प्लॅन ए यशस्वी होण्याची जेव्हा ६० टक्केच शक्यता असते, तेव्हाच प्लॅन बीची गरज निर्माण होते. यामुळे सध्या तरी तशी काही शक्यता नाही.
मला विश्वास आहे की, मोठ्या बहुमताने पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करतील, असेही अमित शहा यांनी म्हटले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजप केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये भाजपा हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येईल.
काँग्रेसचा मोठा नेता देशाच्या विभाजनाबद्दल विधान करतो आणि काँग्रेस पक्ष त्या विधानाचा साधा निषेधही करत नाही किंवा त्यापासून अंतरही राखत नाही. देशातील नागरिकांनी काँग्रेसचा अजेंडा समजून घ्यावा, असे म्हणत त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे.
दक्षिणेतील राज्यात भाजपा हा एकमेव मोठा पक्ष म्हणून समोर येईल. दरम्यान, लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम आता शिगेला पोहोचला आहे. २० मे रोजी पाचव्या टप्प्याचे मतदान संपन्न होईल. या मतदानाच्या माध्यमातून दक्षिणेतील राज्यांचे मतदान जवळपास पूर्ण होणार आहे.